संस्थेची माहिती

कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला

अ.क्र. मूलभूत माहिती तपशील
1 स्थापना 12/03/1955
2 इ-मेल am_yeola@msamb.com
3 फोन क्रमांक 02559 265006, 265346
4 उद्देश शेतकरी बांधवांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळावा, उत्पादक शेतकऱ्यांचा माल विकण्याची व्यवस्था उत्तम व चोख व्हावी व ती जवळपास असावी, वेगवेगळया मार्गाने होणारी आर्थिक फसवणुक व पिळवणुक होऊ नये व अनधिकृतरित्या सुट इत्यादी प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख स्वरुपात शेतक-यांच्या पदरात पडावा, इतर संबंधित घटकांच्या हिताची सुध्दा जपवणुक व्हावी इत्यादी उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
5 बाजार क्षेत्र मुख्य बाजार आवार, येवला (क्षेत्र 10 हेक्टर )
6 बाजार परिसर बाजार परिसर:-
संपुर्ण येवला तालुका हे बाजार समितीचे कार्यक्षेत्र असुन येवला येथील नगर-मनमाड रोडलगत सि. सर्वे नं. ११७/२ या १० हेक्टर स्वः मालकीचे जागेमध्ये संस्थेचे मुख्य मार्केट यार्ड आहे.तसेच उपबाजार अंदरसूल येथे गावाचे पुर्वेस व पश्चिमेस अशी दोन्ही मिळुन ४ हेक्टर १० आर जागा संस्थेच्या स्वः मालकीची आहे.


बाजार समितीची अधिकार व कर्तव्ये -

बाजार समितीने बाजार क्षेत्रात, अधिनियमान्वये केलेले नियम आणि उपविधी यांच्या तरतूदी अंमलात आणणे; बाजार क्षेत्रात कृषि उत्पन्नाच्या पणनाच्या बाबतीत (संचालक, पणन मंडळ किंवा राज्य शासन) वेळोवेळी निर्देश देईल अशा सुविधांची तरतूद करणे, बाजारांच्या संबंधात अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण या बाबतीत किंवा बाजार क्षेत्रातील कोणत्याही जागी कृषि उत्पन्नाच्या पणनाच्या विनियमनासाठी आणि पूर्वोक्त गोष्टींशी संबंधीत असलेल्या प्रयोजनांसाठी आवश्यक असतील अशी इतर कामे करणे, हे या बाजार समितीचे कर्तव्य असेल आणि त्या प्रयोजनासाठी तिला या आधिनियमान्वये किंवा तद्नुसार तरतूद करण्यात येईल अशा अधिकारांचा वापर करता येईल आणि अशा कर्तव्याचे पालन करता येईल अशी कामे पार पाडता येतील.



बाजार आवार -

1) मुख्य बाजार आवार, येवला (क्षेत्र 10 हेक्टर )

संपुर्ण येवला तालुका हे बाजार समितीचे कार्यक्षेत्र असुन येवला येथील नगर-मनमाड रोडलगत सि. सर्वे नं. ११७/२ या १० हेक्टर स्वः मालकीचे जागेमध्ये संस्थेचे मुख्य मार्केट यार्ड आहे. दिवसेंदिवस येवला मुख्य आवारात कांदा, कापुस, मका व भुसारधान्य, टोमॅटो व सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच इतर शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यासाठी लागणा-या आवश्यक सोयी सुविधा बाजार समितीमार्फत पुरविण्यात येत आहे.


उपबाजार आवार

1. अंदरसूल (क्षेत्र 4 हेक्टर 10 आर)

उपबाजार अंदरसूल येथे गावाचे पुर्वेस व पश्चिमेस अशी दोन्ही मिळुन ४ हेक्टर १० आर जागा संस्थेच्या स्वः मालकीची आहे. सदरची जागा दोन ठिकाणी असुन गट नं. १३८ ते १४० या ४ एकर ७ आर जागेत कांदा लिलाव होतो. व गट नं. ७३५ / १ (अ) या ६ एकर ३ आर जागेत बाजार समितीमार्फत केंद्र शासनाच्या टी. एम. सी. योजनेअंतर्गत कॉटन मार्केट विकसीत करण्यात आले आहे. उर्वरीत जागेत मका व भुसारधान्याचे लिलाव होतात. तसेच सदर ठिकाणी १००० मे. टन क्षमतेचे २ गोदाम बांधण्यात आलेले आहेत.


2. पाटोदा (क्षेत्र 11 एकर)

बाजार समितीची पाटोदा येथे पाटोदा - लासलगांव रोडलगत गट नं. १२०/२ अ ते १२०/५ अ मध्ये उपबाजारासाठी ११ एकर जागा स्वः मालकीची असुन त्याठिकाणी शेतकरी व व्यापारी बांधवांसाठी अत्यावश्यक असलेली विविध विकासाची कामे करण्यात आलेली आहेत. त्यापैकी १) आवार तार कम्पाउंड २) आवारातील अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीकरण ३) ५० टनी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा खरेदी व कॅबीन प्लॅटफॉर्मचे काम ४) विहीर खोदाई व बांधकाम ५) सेलहॉल ६) कॅटल शेड ७) शॉपिंग सेंटर ७ गाळे ८) ऑफिस इमारत ९) १००० मे. टन क्षमतेचे ३ गोदाम १०) मुख्य प्रवेशव्दार इ. कामे पुर्ण झालेली आहेत.


3. मौजे डोंगरगांव (क्षेत्र 2.2 हेक्टर)

बाजार समितीने मौजे डोंगरगांव ता. येवला येथे मौजे डोंगरगांव व परिसरातील शेतकरी बांधवांच्या सोयीच्या दृष्टीने मौजे डोंगरगांव येथील ग्रामपंचायतीच्या जागेत दि. १९ / १२ / २०२३ पासुन कांदा, मका, सोयाबीन व भुसारधान्य या शेतीमालाचे लिलाव सुरु केलेले आहेत. सदरच्या सर्व शेतमाल लिलावास परिसरातील शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक व्यापारी शेतमालाची खरेदी करीत असल्याने शेतमालाची चांगली आवक होत असून बाजारभावही चांगल्या प्रमाणात मिळत आहेत. मौजे डोंगरगांव येथे उपबाजार सुरु करणेसाठी ग्रामपंचायतीने गट नं. १३ मधील २.२० हेक्टर जमीन बाजार समितीस संपादित करणेस संमती दिलेली असून सदरची जागा शासकीय दराने संपादित करणेसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणेत आलेला आहे. जमीन संपादित होताच त्याठिकाणी जमीन सपाटीकरण, खडीकरण व काँक्रीटीकरण, वॉलकम्पाउंड, प्रवेशव्दार व सुरक्षारक्षक कक्ष, प्रशस्त वाहनतळ, सेलहॉल, गोदाम, इलेक्ट्रॉनिक वे ब्रीज, शेतकरी निवास, स्वच्छता गृह कॅन्टीन, शेतीउपयोगी वस्तुंचे शॉपिंग सेंटर इ. सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


अर्थसंकल्प

अहवाल काळात सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प मा. कार्यकारी संचालक साहेब, म. राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचेकडे जा.क्र. ५३६/२०२३-२४ दि. ३१/१/२०२४ ने मंजुरीसाठी सादर केलेला होता. त्यास त्यांचेकडील आदेश जा. क्र. कृपमं/बास/असं/२०२४-२५/मंजुरी/७५४/२०२४ दि. २९/३/२०२४ अन्वये मंजुरी मिळालेली आहे.


कर्ज

बाजार समितीने सन २०२२-२३ मध्ये म. राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचेकडून राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत उपबाजार पाटोदा येथे १००० मे. टन गोदामाचे बांधकाम करणेसाठी रु. ४७.११ लाख इतके कर्ज घेतलेले असुन पणन मंडळ पुणे यांनी रु. ४७,११,०००/- इतकी कर्ज रक्कम परस्पर ठेकेदारास अदा केलेली आहे. सदर कर्जाची परतफेड दर तिमाही हप्त्याने चालु असुन इतर कोणत्याही वित्तीय संस्थेचे कर्ज थकीत अथवा बाकी नाही.


मागील पाच वर्षातील येवला बाजार समितीच्या मुख्य व उपबाजारातील एकत्रित शेतीमालाची आवक, किंमत खालीलप्रमाणे.

बाजार वर्ष शेतीमालाची आवक (क्विंटल) शेतीमालाची एकुण किंमत (रुपये)
2020-2021 35,12,609 5,45,19,24,100
2021-2022 42,10,607 6,44,07,58,348
2022-2023 49,97,806 5,19,14,28,500
2023-2024 35,62,168 5,10,11,29,700
2024-2025 31,02,407 6,65,12,06,100


मागील पाच वर्षातील येवला बाजार समितीच्या मुख्य व उपबाजारातील एकत्रित उत्पन्न खर्च व वाढावा खालीलप्रमाणे.

बाजार वर्ष उत्पन्न रुपये खर्च रुपये वाढावा (नफा) रुपये
2020-2021 5,86,71,155 3,43,05,375 3,43,05,375
2021-2022 7,03,93,967 3,74,03,056 3,29,90,911
2022-2023 5,77,50,966 3,92,00,367 1,85,50,599
2023-2024 5,63,09,729 3,88,55,128 1,74,54,601
2024-2025 7,13,66,266 4,10,95,332 3,02,70,934


अनुज्ञप्ती (लायसेन्स)

येवला बाजार समितीचे संपुर्ण कार्यक्षेत्रामध्ये शेतीमाल खरेदी विक्री व आडत भाजीपाला, जनावरे खरेदीदार व दलाल तसेच इतर घटकांसाठी बाजार समितीने येवला मुख्य आवारात व अंदरसुल उपबाजारात पुढीलप्रमाणे लायसेन्स दिलेले आहेत.

अनुज्ञप्ती प्रकार मुख्य मार्केट येवला सब मार्केट अंदरसूल
जनरल कमिशन एजंट 127 46
अ वर्ग व्यापारी 175 79
अ वर्ग २ जनावरे व्यापारी 34 -
हमाल 188 80
मापारी 61 28
एकुण 585 233
Top