संस्थेची माहिती

कृषि उत्पन्न बाजार समिती, सोयी सुविधा

1.येवला मुख्य आवारातील सोयी सुविधा


येवला मुख्य मार्केट यार्डमध्ये संस्थेने स्वतःचे फंडातुन व केंद्र व राज्य शासनाचे अनुदानातुन खालील प्रमाणे बांधकामे व सुविधा शेतकरी व व्यापारी बांधवासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

  • मध्यवर्ती कार्यालयीन इमारत
  • आवार वॉलकंपाऊंड
  • संपूर्ण लिलाव जागेचे ट्रिमिक्स काँक्रीटीकरण
  • अद्यावत कॅन्टीन
  • ऑक्शन शेड्स
  • लिलाव ओटे
  • कॅटल शेड
  • जनावरांसाठी पाण्याचा आहाळ
  • अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण
  • ३० टनी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा
  • शॉपिंग सेंटर गाळे
  • बाजारभाव टिकर बोर्ड
  • बाजार आवार विद्युतीकरण (हायमास्ट लाईट व पथदीप)
  • सॅनेटरी ब्लॉक
  • पाणीपुरवठ्याची व्यवस्था
  • भुसारधान्य व्यापा-यांना पेमेंट करण्यासाठी १५ गाळे इत्यादी

तसेच परवानेधारक खरेदीदार व्यापारी यांनी खरेदी केलेला शेतीमाल सुरक्षित राहणेसाठी बाजार समितीकडुन भाडे कराराने घेतलेल्या प्लॉटवर त्यांच्या स्वःखर्चाने शेड्स व ऑफिस बांधलेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना शेतीमालाची रक्कम मार्केट आवारातच अदा केली जाते.


2. उपबाजार अंदरसूल आवारातील सोयी सुविधा

अंदरसूल उपबाजारात बाजार समितीने स्वतःच्या फंडातुन तसेच राज्य व केंद्र शासनाच्या अनुदानातुन ऑफिस कम गोडाउन, सेलहॉल, लिलाव जागा काँक्रीटीकरण, प्रवेशव्दार, आवार तार कम्पाउंड व पाण्याची टाकी इ. बांधकामे केलेली असुन शेतकरी, व्यापारी व इतर घटकांसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच उपबाजार आवारातील अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणेत आलेले असुन जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा आहाळ बांधलेला आहे. त्याचप्रमाणे संस्थेने शेतक-यांचे शेतीमालाचे लवकारात लवकर वजनमाप होणेसाठी गावाचे पश्चिमेकडील जागेत ३० टनी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविलेला आहे. तसेच गट नं. ७३५/१ (अ) या ६ एकर ३ आर जागेत बाजार समितीमार्फत केंद्र शासनाच्या टी.एम.सी. योजनेअंतर्गत कॉटन मार्केट विकसीत करण्यात आलेले असुन त्याठिकाणी १००० मे. टन क्षमतेचे २ गोदामांचे बांधकाम केलेले आहे.


Top